💥परभणी जिल्ह्यात 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन....!


💥अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.जी.लांडगे यांनी दिली आहे💥

परभणी (दि.10 नोव्हेंबर): राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार परभणी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघातर्फे (दि. 12 नोव्हेंबर) रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.जी. लांडगे यांनी दिली आहे.

या वेळी मोटार वाहन, भूसंपादन, धनादेश अनादर, कौटूंबीक प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, म्युनिसिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात अनेक वर्षापासून प्रलंबित इतर खटल्यांचे व खटला दाखलपूर्व प्रकरणे आर्थिक व वेळेचा अपव्यय टाळून आपापसांत सामोपचाराने, तडजोड घडवून, वाद मिटवून प्रलंबीत प्रकरणे निकाल काढण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशानुसार देशभर 12 नाव्हेंबर रोजी एकाच दिवशी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.           

परभणी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु.एम. नंदेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतीसाठी जिल्हा वकील संघ, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांचे सहकार्य लाभणार आहे.

या आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ज्या पक्षकारांना तडजोडीने आपली प्रकरणे निकाली काढायची असतील अशा संबंधित सर्व पक्षकार व त्यांचे अधिवक्ता यांनी उपस्थित राहून तडजोडीने आपापले खटले निकाली काढावेत, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस.जी. लांडगे यांनी आवाहन केले आहे.....                       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या