💥अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज जिंतूरात....!


💥शहरातील राधाकृष्ण मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांचे जिंतूर येथे एकदिवसीय व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

शहरातील राधा कृष्ण मंगल कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न होणार असल्याची माहिती अँड जुगलकिशोर साबू यांनी दिली. अमूल्य जीवन कन्येचे या विषयावर स्व. सौ. वर्षा साबू कालानी यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे आयोजन करण्यात आले आहे दि १८ ऑक्टोबर रोजी दु २वाजता हा कार्यक्रम राधाकृष्ण मंगल कार्यालय ग्रीन पार्क जिंतूर येथे होईल या व्याख्यानास सर्व भावीक भक्त व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अँड जुगलकिशोर साबू यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या