💥पुर्णेतील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयात मानसिक स्वास्थ सप्ताह साजरा....!


💥यावेळी निवडक चित्रांचे भिंतीपत्रक बनवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आले💥


पूर्णा. (दि.१८ आक्टोंबर) - येथील श्री गुरु बुद्धीस्वामी महाविद्यालयात विद्यार्थी समुपदेशन कक्ष व मानसशास्त्र विभाग यांच्याद्वारे  जागतिक मानसिक स्वास्थ्य  सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. जागतिक मानसिक स्वस्थ दिन निमित्त 10 ऑक्टोबर रोजी सदरील कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली.  या दरम्यान कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता अकरावी  व बारावीच्या विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्य, मापन चाचणी, ध्यानधारणा, प्रात्यक्षिक व मानसिक स्वास्थ्य संवर्धनासाठी उपबोधन केले गेले. तसेच महाविद्यालयात मानसिक स्वास्थ संबंधी चित्रकला प्रदर्शन घेण्यात आले. निवडक चित्रांचे भिंतीपत्रक बनवून मान्यवरांच्या हस्ते त्यांचे उद्घाटन करण्यात आले. 

या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या सकारात्मक प्रतिक्रिया दिसून आल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षक श्री. शेजुळे अनुशाल्व व श्री. मिटकरी उमाकांत यांच्या सहकार्याने   मानसशास्त्राचे  प्रा.  पर्लेकर राजेश व डॉ. व्यंकटराव कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. चित्रकला प्रदर्शनास संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोद अण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदराव कदम, तसेच प्राचार्य के. राजकुमार व उपप्राचार्य संजय दळवी, पर्यवेक्षक उमाकांत मिटकरी यांची विशेष उपस्थिती होती.  राजेश पर्लेकर,चंद्रकांत चाकोते तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी प्रदर्शन पाहून सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या