💥बहुजन साहित्य संघातर्फे संतराज आंबेकर यांना बाल अनाथ पुरस्काराचे पत्र प्रदान....!


💥आंबेकर यांनी आतापर्यंत दोनशेच्यावर अनाथ बालकांना मायेचे पालकत्व उपलब्ध करून दिले💥

 ✍️ मोहन चौकेकर 

जाळिचा देव : दि. २० नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित असलेल्या बहुजन साहित्य संघ, चिखलीच्या बहुचर्चित बहुजन साहित्य संमेलन - २०२२ मध्ये प्रदान करण्यात येणाऱ्या बाल अनाथ सेवा प्रित्यर्थ जाहीर झालेल्या फुले - शाहू - आंबेडकर या बहुमानाच्या

पुरस्काराचे निवड तथा निमंत्रण पत्र आज दि. १५ - १० - २०२२ रोजी सुप्रसिद्ध जाळीचा देव येथे त्यांच्या निवासस्थानी मान्यवरांच्या उपस्थितीत, संघाचे अध्यक्ष ॲड विजयकुमार कस्तुरे, सचिव शाहीर मनोहर पवार व संघटक/निमंत्रक बबन महामुने यांनी संतराज आंबेकर यांना सन्मानपूर्वक प्रदान केले. आंबेकर यांनी आतापर्यंत दोनशेच्यावर अनाथ बालकांना मायेचे पालकत्व उपलब्ध करून दिले असून त्यांच्या पालनपोषणासह सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केले आहे....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या