💥हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार ७० वर्ष जुन्या वाड्याला आग : शेजारील दारूचे गोडाऊनही भस्मसात...!


💥करोडोच्या नुकसानीचा अंदाज संपूर्ण वाडा जळून खाक रहिवास्यांच्या केवळ अंगावरील कपडे शिल्लक💥

 ✍🏻शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली : जिल्ह्यातील जवळा बाजार  येथील परिहार परिवाराचा जुना लाकडीवाडा असलेल्या घरासह देशी दारूच्या गोदामाला २४ ऑक्टोबर रोजी रात्री दहा ते साडे दहाच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हा वाडा १९५० सालचा असल्याची माहिती आहे. संपूर्ण वाडा जळून खाक झाला असून त्यातून नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडलेल्या ८ कुटुंबांकडे आता काहीच शिल्लक नाही.


घरात आग लागली की दिसतात सर्व संपत्तीवर पाणी सोडून कुटुंब जीवाच्या आकांताने घराबाहेर पडले,  जवळाबाजार येथील भीषण आगीत सुमारे दीड कोटींचे नुकसान जवळाबाजार येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागलेली भीषण आग तब्बल दहा तासानंतर मंगळवारी ता. २५ पहाटे आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. घराला आग लागल्याचे दिसतात घरात असलेले शंभर जण सर्व संपत्तीवर पाणी सोडून जीवाच्या आकांताने घराबाहेर पडले. जीव वाचला हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे प्रतिक्रिया देताना लक्ष्मण परिहार यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

जवळाबाजार येथे लक्ष्मण परिहार यांचे कुटुंब एकत्रित राहतात. जुना माळवदाचा वाडा असलेल्या घरामध्ये लहान-मोठे १०० सदस्य आहेत. दिवाळीनिमित्त घराची सर्व साफसफाई केल्यानंतर कुटुंबातील सदस्य सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जेवण करत होते. यावेळी घराच्या एका खोलीतून अचानक धूर निघू लागला. घराला सागवान लाकडाचे माळवद असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केले. घराला आग लागली लक्ष देतात भोजन करत असलेले कुटुंबातील सदस्य आहे त्या परिस्थितीत घराच्या बाहेर पडले. आगीचा मोठा भडका उडाल्याचे लक्ष देतात परिसरातील गावकरी देखील जमा झाले सुरुवातीला मिळेल त्या साहित्याने आगीवर पाणी ओतण्यास सुरुवात केली मात्र आग अधिकच भडकत होती. 

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बाराटे, उपनिरीक्षक संदीप तावडे, जमादार भुजंग कोकरे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. घटनास्थळावरील परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने औंढा नागनाथ, परभणी, वसमत, कळमनुरी व हिंगोली येथे अग्निशामक दलाला संपर्क साधला. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अग्निशामक दल दाखल झाले. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजल्यापासून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. मात्र घरातील लाकडी साहित्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण झाले होते. तब्बल नऊ तासानंतर आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण घर व घरातील सर्व उपयोगी साहित्यसह रोख रक्कम व दागिने जळून खाक झाले. या आगीमध्ये सुमारे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज लक्ष्मण परिहार यांनी व्यक्त केला आहे. 

याबाबत परिहार यांनी सांगितले की घराला आग लागल्यानंतर सर्व कुटुंब जीव वाचवण्यासाठी घरातून बाहेर पडले त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र घरातील सोन्या चांदीच्या दागिन्याचे अक्षरशः पाणी झाले. घरातील रोख रक्कम देखील जळून खाक झाली. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज असल्याचेही त्यांनी सांगितले दरम्यान या घटनेमुळे शंभर सदस्यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. या प्रकरणी अद्याप पर्यंत हट्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या