💥पुर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी...!


💥प्रहार जनशक्ती पक्षाकडून पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंतळेळ यांच्याकडे मागणी💥


पुर्णा (दि.१५ आक्टोंबर) -
पुर्णा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी व पूर्णा तालुक्यातील खरडनी  व गोगलगायी बाधित झालेल्या पिकांचा अहवाल देण्यात यावा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने राज्याचे आरोग्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देण्यात आले.


 पूर्णा तालुक्यात सुरुवातीला सतत होणारा पाऊस या पावसा मध्ये बरेचसे पिके वाहून गेले व त्यानंतर सतत पावसाने मारलेली दडी या सर्व कारणांमुळे पूर्णा तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे तरी पूर्णा तालुक्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्याला मदत देणे गरजेचे आहे अशी जिल्ह्याचे पालक मंत्री तानाजी सावंत यांना निवेदन सादर करण्यात आले.


 यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नरेश जोगदंड तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के,  चुडावा सर्कल प्रमुख श्रीहरी इंगोले, मीडिया प्रभारी मंचकराव कुऱ्हे,गंगाधर इंगोले, गंगाप्रसाद वळसे,  नवनाथ चेपेले आदींची उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या