💥राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची ‘युवा संवाद यात्रा’ उद्या गुरुवार दि.१३ आक्टोंबर रोजी परभणीत...!


💥ज्येष्ठ नेते राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहोचावे यासाठी संवाद यात्रा💥

परभणी(दि.१२ आक्टोंबर) : राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाची ‘शरद युवा संवाद यात्रा’ उद्या गुरुवार दि.१३ आक्टोंबर २०२२ रोजी परभणी जिल्ह्यात दाखल होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचे विचार तळागाळातील नागरीकांपर्यंत पोहोचावेत या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख हे या यात्रेतून विधानसभा निहाय प्रत्येक तालुक्यात संवाद साधणार आहेत. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय भांबळे, राजेश विटेकर, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी आमदार मधुसूदन केंद्रे, भरत घनदाट, रुपेश काळे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष सिध्दांत विजय हाके यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या