💥राष्ट्रीय महामार्गावरील राहाटी येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन नदीपात्रात उडी मारलेल्या तरुणाचा शोध अद्यापही सुरूच...!


💥पोलिसांच्या पथकाने अग्निशामक दलास पाचारण करुन शोध सुरु केला💥

परभणी (दि.08 आक्टोंबर) :  परभणी-वसमत राष्ट्रीय महामार्गावरील राहाटी येथील पूर्णा नदीच्या पुलावरुन काल शुक्रवार दि.०७ आक्टोंबर २०२२ रोजी नदीपात्रात उडी मारलेल्या युवकाचा सरकारी यंत्रणांनी आज शनिवार दि.०८ आक्टोंबर २०२२ रोजी दुसर्‍या दिवशीही शोध सुरुच ठेवला असून आज दुसरा दिवस उजाडल्यानंतर देखील सरकारी यंत्रणांना त्या तरुणाचा शोध लावण्यात यश आलेले नाही.

      परभणी-वसमत महामार्गावरील पुर्णा नदीपात्रावरील राहाटी पुलावरून काल शुक्रवार दि.०७ आक्टोंबर २०२२ रोजी दुपारी ०३-०० वाजेच्या सुमारास एका युवकाने पुलावरुन नदीपात्रात उडी मारल्याची माहिती कळाल्याबरोबर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व पुलावर उभ्या असणार्‍या दुचाकीसह बॅग ताब्यात घेतली. त्यात ओळखपत्र सापडले. त्यातून नदीपात्रात उडी मारलेला युवक परभणीतील प्रभावती नगरातील असल्याची माहिती समोर आली. पोलिसांच्या पथकाने अग्निशामक दलास पाचारण करुन शोध सुरु केला. परंतु, सायंकाळी उशीरापर्यंत त्या युवकाचा शोध लागला नाही. शनिवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत नदीपात्रात शोधूनही त्या युवकाचा मृतदेह आढळला नाही....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या