💥माणिक भाऊ फड यांची सामाजिक बांधिलकी ; स्वखर्चाने केली रस्त्याची दुरुस्ती...!


💥त्यांनी जोपासलेल्या सामाजिक बांधिलकीचे सर्वस्थरातून होत आहे कौतुक💥 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारात असलेल्या कन्हेरवाडी -  देव्हाडा- नंदागौळ या रस्त्यावरील पूल अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे वाहून गेल्याने या रस्त्यावरील दळणवळण ठप्प झाल्याचे लक्षात येताच रस्ता दुरुस्तीच्या नागरिकांच्या मागणीला प्रतिसाद देत येथील आ. धनंजय मुंडे, वाल्मिक आणा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते माणिकभाऊ फड यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत स्वखर्चातून हा रस्ता दुरुस्त केला आहे.


    याबाबत अधिक माहिती अशी की काही दिवसांपूर्वी सबंध मराठवाड्यामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातला होता. परळी तालुक्यामध्ये देखील परतीच्या पावसाने झालेल्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे अतिवृष्टी नुकसान झाले होते. याच परतीच्या पावसाने तालुक्यातील कन्हेरवाडी - देव्हाडा - नंदागौळ या मार्गावरील पूल वाहून गेल्याने या रस्त्यावरून सुरू असणारी रहदारी अक्षरशः ठप्प झाली व परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यांची कामे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये रखडली. कन्हेरवाडी, देव्हाडा,  नंदागौळ परिसरामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय असून त्याच्या जोडीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय देखील केला जातो. ऐन सुगीच्या दिवसांमध्ये हा कनेरवाडी देव्हारा नंदागौळ या मार्गावरील रस्ताच वाहून गेल्याने परिसरातील शेतकरी दुग्ध व्यावसायिक नागरिक आदींना पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने दळणवळणास अडथळा निर्माण होऊन अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत होते.  दीपावलीचा सण तोंडावर आल्याने ऐन सणासुदीच्या काळामध्ये शेतकरी तथा नागरिकांचे पिकांची काढणी खुढणी मळणी आदी महत्त्वाचे कामे रखडल्याने येथील ग्रामस्थांकडून रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली. या मागणीला प्रतिसाद देत नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासणारे परळी तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते माणिकभाऊ फड हे नागरिक तथा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले. सामाजिक बांधिलकी जोपासत  माणिकभाऊ फड यांनी मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा हा  रस्त्याचा प्रश्न कुठल्याही मदतीची वाट न पाहता स्वखर्चाने रस्ता दुरुस्ती करून मिटवला आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या