💥पुर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड...!


💥अध्यक्षपदी सुधाकर काळे,उपाध्यक्षपदी प्रताप काळे,शिक्षण तज्ज्ञ जनक काळे यांची बिनविरोध निवड💥

पुर्णा (दि.११ आक्टोंबर) - तालुक्यातील धानोरा काळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समिती पूनर्गठीत सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची बैठकीत चर्चा झाली असता शाळेचा विकास,विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी अभ्यासू पालकातून बिनविरोध सदस्य द्यावा असे ठरले. यावेळी प्र.मु.पी.डी.डुकरे यांच्या अध्यक्षतेखाली  समितीच्या अध्यक्षपदी सुधाकर काळे तर उपाध्यक्षपदी उद्यान पंडित शेतकरी प्रताप काळे,शिक्षण तज्ज्ञ म्हणून जनक काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी पालक व विद्यार्थ्यांनी नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले.

         पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील जी.प.प्रा.शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी दि.१० ऑक्टोबर रोजी पालकांची बैठक घेण्यात आली यामध्ये अध्यक्षपदी सुधाकर काळे तर उपाध्यक्षपदी उद्यान पंडित शेतकरी प्रताप काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .सदस्यपदी शिक्षण तज्ज्ञ जनक काळे,हनुमान भालेराव,मिरा काळे,एकनाथ काळे,भाग्यश्री झीलमेवाड,नारायण पालटवाड,सोनाली काळे,दत्त्ता काळे,राधा काळे,मिरा काळे,शिवाजी जाधव,शिक्षक प्रतिनिधी सौ.प्रांजली बांगरे,सचिव शेख एस.एफ.,विद्यार्थी प्रतिनिधी सृष्टी काळे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी केंद्रप्रमुख विनोदकुमार कणकुटे यांनी भेट देत नवनिर्वाचित सदस्यांचे व प्र.मुख्याध्यापक पी.डी.डुकरे यांचे अभिनंदन करून शुभेछा दिल्या.

यशस्वीतेसाठी शिक्षक त्र्यंबक स्वामी,विनोद मेडेवाड,सुनील सावळे,सचिन खोसे,आनंद डुमने,बळीराम पिल्लेवाड,सौ.राधा होळकर,सौ.वंदना पौळ,सौ.प्रांजली बांगरे यांनी परिश्रम घेतले. खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेल्या बैठकीत बिनविरोध निवड झालेल्या सदस्यांचा शाळेच्या वतीने यावेळी सत्कार करण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या