💥परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार रागसुधा आर.यांनी स्विकारला...!


💥जिल्ह्याचे कर्तव्यकठोर पोलिस अधिक्षक जयंत मीना यांना भावपुर्ण निरोप💥

परभणी (दि.२२ आक्टोंबर) : परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार श्रीमती रागसुधा आर यांनी आज शनिवार दि.२२ आक्टोंबर २०२२ स्विकारला.

परभणी जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मीना यांची राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी दि.२० आक्टोंबर २०२२ रोजी रात्री बदली केली. मीना यांच्या या रिक्त जागी जालना येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 3 च्या समादेशक श्रीमती रागसुधा आर. यांची अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 राज्याच्या गृह विभागाने पोलिस अधिक्षक दर्जाच्या भारतीय पोलिस सेवा व राज्य पोलिस सेवा अधिका-यांच्या बदल्या व पदस्थापनांचा आदेश लागू केला होता. त्यात जिल्हा पोलिस अधिक्षक मीना यांचीही बदली करण्यात आली. मीना यांच्या जागी अधिक्षक म्हणून रागसुधा आर. यांची नियुक्ती करण्यात आली शनिवारी रागसुधा आर. यांनी जिल्हा अधिक्षक पदाचा पदभार स्विकारला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या