💥सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयातील मूलभूत सोयी-सुविधांसह अन्य आरोग्य विषयक समस्या तातडीने सोडवाव्यात....!

 


💥राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांना सेलूकरांचे थेट साकडे : रुग्णालयात सोयी-सुविधा उपलब्ध करण्याची मागणी💥

सेलू (दि.14 आक्टोंबर) : सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयातील मूलभूत सोयी-सुविधांसह अन्य आरोग्य विषयक समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी सेलू येथील डॉ. अनिकेत जोगदंड यांनी थेट राज्याचे आरोग्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली.

                सेलू रुग्णालयात अनेक गोष्टींची कमतरता आहे. विशेषतः नवीन अपघात विभागासाठी इमारत तयार आहे. परंतु, 4 वैद्यकीय अधिकारी, 10 अधिपरिचारीका, 4 कर्मचारी नियमित किंवा कंत्राटी तत्वावर उपलब्ध करणे गरजेचे आहे. रुग्णालयात रुग्णवाहिका आहे. परंतु, वाहनचालक नाही. कक्षसेवकाची 5 पदे मंजूर आहेत, 3 पदे रिक्त आहेत. किचन उपलब्ध आहे परंतु, नाष्ट्यासह जेवण मिळत नाही. कारण, नियमित किंवा कंत्राटी स्वयंपाकी नाही. आयसीयु उपलब्ध आहे, परंतु विशेषतज्ज्ञ उपलब्ध नाही. असे नमूद करीत 50 खाटांचे हे रुग्णालय 100 खाटांमध्ये श्रेणीवर्ध करावे व अन्य मशनरींसह सुविधाही उपलब्ध करुन द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या