💥परभणीतील अनाथ मुलीस दिवाळीला मिळाले अमेरिकेत हक्काचे घर ...!


💥एनआयआर पालकांनी घेतले दत्तक : राज्यातील दुसरी तर जिल्ह्यातील पहिली घटना💥

परभणी : जीवन आशा संचालित आशा शिशुगृहातील अनाथ मुलीस काल दि.२१ आक्टोंबर २०२२ रोजी दत्तक अधिनियम 2022 अन्वये हक्काचे पालक राजेंद्र वर्मा आणि नीलिमा वर्मा मिळाले असून आज दिनांक 21.10.2022 रोजी मा. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी त्यांच्या दत्तक अर्जावर सुनावणी करताना मुलीचे हित आणि पालकांची दत्तक घेण्या प्रति एका अनाथ बालिकेविषयी प्रेरणा पाहून त्यांचे दत्तक आदेश प्रारित केले. नवीन कायद्यानुसार परभणी जिल्ह्यातील पहिला आणि राज्यातील दुसरा आदेश पारित झाला यासाठी मा.जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके व बाल संरक्षण कक्ष परभणी यांनी कार्यवाही केली.

राजेंद्र वर्मा आणि नीलिमा वर्मा यांनी मूल दत्तक घेण्यासाठी रीतसर केंद्रीय दत्तक ग्रहण संस्था कारा यांच्याकडे नोंदणी केली होती. कारा ने त्यांच्या जेष्ठते नुसार त्यांना परभणी येथील मुलगी रेफर केली. मुलीची निवड झाल्यांनतर सर्व कायदेशीर बाबींचा तपास करून सदरील प्रकरण जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री कैलास तिडके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केले. सदरील प्रकरणात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पालकांशी चर्चा करून सर्व कागदपत्र तपासून आज दिनांक 21.10.2022 रोजी दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर एक शुभ संदेश म्हणून  सदरील पालकांना दत्तक पालक म्हणून घोषित केले. 

01 सप्टेंबर 2022 पासून अमलात आलेल्या बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण सुधारणा कायदा 2021 ची अंमल बजावणी करण्यासाठी मॉडेल दुरुस्ती नियम  2022 ची अधिसूचना जिल्हा दंडाधिकारी यांना दत्तक प्रकरणात आदेश करण्याचा अधिकार मिळाला आहे. या आदेशानुसार जिल्हाधिकारी संस्थेतील अनाथ, निराधार बालका बरोबर हिंदू दत्तक कायद्या नुसार इच्छुक पालक, सावत्र मूल दत्तक दत्तक आदेश प्रारित करू शकतात जे कार्य या पूर्वी जिल्हा न्यायालया मार्फत केले जात होते. 

सदरील प्रकरण कायदेशीर होण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री कैलास तिडके, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आम्रपाली पाचपूंजे, एस. एम.कसबेकर अधीक्षक आशा शिशुगृह परभणी व सामाजिक कार्यकर्ते धर्मेंद्र कांबळे यांनी कार्य केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या