💥पुर्णा तालुक्यातील खुजडा येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न...!


💥यावेळी उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक आबनराव पारवे सर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला💥

पुर्णा (दि.१७ आक्टोंबर) - आनंददायी अभ्यासक्रमावर आधारित या महिन्यातील शिक्षण परिषद,खूजडा येथे संपन्न झाली.सदर कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी श्री बालाजी कापसीकर साहेब,जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री ज्ञानोबा साबळे साहेब,केंद्रप्रमुख श्री सय्यद सर,केंद्रिय मुख्याध्यापिका श्रीमती रेखा जोंधळे मॅडम,विषयतज्ञ श्री अनिल ढाले सर,केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद  उपस्थित होते.

उत्कृष्ट जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री आबनराव पारवे सर यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख श्री सय्यद सर यांनी केले.गटशिक्षणाधिकारी श्री कापसीकर साहेब यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे असे मार्गदर्शन केले.त्यानंतर जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री साबळे साहेब यांनी पण आपल्या भाषणातून सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान यावे,असे आवाहन केले.विषयतज्ञ श्री ढाले सर यांनी आनंददायी अभ्यासक्रम प्रभावी कसा आहे ? हे स्पष्ट केले.

आनंददायी अभ्यासक्रमावर श्री कंधारे सर,श्री अंबुरे सर व श्री पारवे सर यांनी सखोल मार्गदर्शन केले आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या