💥परभणी जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध....!


💥रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी यांना राहतील💥

परभणी (दि.20 आक्टोंबर) : जिल्हा माहिती कार्यालय, परभणी येथील वृत्तपत्रांची रद्दी विक्री  करण्यात येणार आहे. ज्यांना रद्दी घ्यावयाची असेल त्यांना कार्यालयीन वेळेत रद्दी पाहावयास मिळेल. ज्यांना रद्दी विकत घ्यावयाची  आहे, अशा नोंदणीकृत रद्दी खरेदीदारांनी त्यांचे लिफाफा बंद दर प्रति किलोप्रमाणे दरपत्रक जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय,प्रशासकीय इमारत,पहिला मजला परभणी या पत्यावर बुधवार  दि.02 नोव्हेंबर 2022 रोजीच्या सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दाखल करावीत. या संदर्भातील अटी व शर्ती कार्यालयीन वेळेत कार्यालयीन कामाच्या दिवशी पाहता येतील. रद्दी विक्रीचे दरपत्रक मंजूर करणे अथवा रद्द करणे हे सर्व अधिकार जिल्हा माहिती अधिकारी, परभणी यांना राहतील....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या