💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील सैनिक नगर व बालराज नगर येथील रहिवाश्यांसाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे ठरले देवदूत.....!


 💥गोरगरीबांच्या घरांचा गंभीर प्रश्न पोहोचवला महसूलमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या दालणात💥 

💥महसूलमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे-पाटील व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यातील बैठक ठरली सकारात्मक💥 

पूर्णा (दि.१२ आक्टोंबर) - तालुक्यातील ताडकळस मधील सैनिक नगर व बलराज नगर येथील रहिवाश्यांना तहसीलदार यांनी अतिक्रमण विषयी पाठविलेल्या नोटीस प्रकरणावर कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या पुढाकाराने महसूलमंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे सकारात्मक बैठक पार पडली.


 
याप्रसंगी मा.ना.विखे-पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच कोणालाही बेघर करता येणार नाही, याबाबत प्रशासकीय तोडगा काढण्याचे संकेत सुध्दा दिले. तसेच याविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. आणि सर्वांना आहेत त्या परिस्थितीमध्ये कायम ठेवण्यासंदर्भात निर्देश दिले असल्यामुळे ताडकळस येथील सैनिक नगर व बालराज नगर वासियांसाठी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे अक्षरशः देवदूत ठरले आहेत,

यावेळी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, पूर्णा तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर, मित्रमंडळाचे पूर्णा तालुकाध्यक्ष गणेशराव कदम, युवा तालुकाध्यक्ष मारोती मोहिते, बालाजी रुद्रवार, विश्वनाथ होळकर, संजय गवते, मुक्रम शेख,शमीम पठाण यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या