💥गंगाखेड तालुक्यातील जवळा ( रु ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीची निवड बिनविरोध...!


💥शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्षपदी शिवाजी टेंगुळे तर उपाध्यक्ष पदी शेख इसुब यांची निवड💥  


       गंगाखेड (दि.०६ आक्टोंबर) - गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळा (रु ) ता. गंगाखेड येथील जिल्हा परिषद शाळेतील शालेय व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी शिवाजी    टेंगुळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी शे. इसुब यांची निवड करण्यात आली. सदस्य, शिक्षक प्रेमी यांची देखील निवड करण्यात आली. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती केंद्रप्रमुख  श्री पवार सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री भडके सर, सय्यद  सर, काजी सर, मामालगे  मॅडम  चेअरमन जगन्नाथ कदम, सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, गावातील पालक व इतर नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या