💥देशभरात दिवाळी साजरी होत असतांना आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला भीषण आग...!


💥फटाक्यांच्या स्टॉलला लागलेल्या आगीत दोघांचा होरपळून मृत्यू💥

नवी दिल्ली : देशभरात दिवाळीचा आनंद ओसंडून वाहत आहे सर्वत्र खरेदी आणि  फटाके खरेदी करण्यात येत आहे प्रत्येक शहरात फटाक्यांचे स्टॉल लागले आहेत त्यातच आंध्र प्रदेशातील विजयवाडामध्ये फटाक्यांच्या स्टॉलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. 

आग लागल्यानंतर फटाक्यांनीही पेट घेतला आणि बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले दरम्यान, आगीमध्ये दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे विजयवाडामध्ये लागलेल्या आगीत तीन दुकाने पूर्ण जळून खाक झाली आहेत. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे इतर दुकांनाना आगीपासून वाचवल आग लागल्यानंतर मोठा आवाज झाला. 

त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आग लागण्याचे कारण अद्याप समोर आले नाही स्थानिक आमदार मल्लाी विष्णू आणि पोलिस आयुक्त के.आर.टाटा यांनी घटनास्थळी भेट दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या