💥पुर्णेत ई-पॉस मशीनच्या तांत्रिक अडचणी मुळे भर दिपावली सनात शिधा पत्रिका धारकांना राहावे लागतेय स्वस्त धान्यापासून वंचित....!


💥महसूल प्रशासनाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघड : स्वतः धान्य दुकानदार व महसुल प्रशासनाचे षडयंत्र तर नव्हे ना ?💥

पुर्णा:(दि.२५ आक्टोंबर) - पूर्णा तालुक्यातील शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांनी शासकीय स्वस्त धान्यासह शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या अन्य मालाची उचल करून लाभार्थ्यांना धान्य वाटपास सुरूवात केली खरी परंतु प्रथमतः काही शिधापत्रिका धारकांना वितरणही करण्यात आले परंतु नंतर मात्र ई-पॉस मशीनचे सर्वर डाऊन असल्याचे कारण पुढे करून वाटपास टाळाटाळ सुरू करण्यात आल्यामुळे ऐन दिपावली सनाच्या काळात असंख्य शिधापत्रिका धारकांना शासकीय स्वस्त धान्यापासून अक्षरशः वंचित राहावे लागल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

मागील अनेक दिवसांपासून ई-पॉस मशीनचा सर्वर डाऊन झाल्यामुळे केंद्र/राज्य शासनाकडून मिळणाऱ्या शासकीय स्वस्त धान्यासह राज्य शासनाकडून दिपावली सना निमित्त वितरीत होणाऱ्या 'आनंदाचा शिधा' वितरणाचे काम देखील अत्यल्प वेळ चालत आहे एका दुकानदाराला दिवसभराची फुरसत करून एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दिड तासाचा वेळ लागत आहे. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते स्वस्त धान्य दुकानामार्फत होणाऱ्या रेशन धान्य वितरण व्यवस्थेत पारदर्शकता यावी या उद्देशाने ई-पॉस या बायोमेट्रिक प्रणालीचा वापर राज्यभरात सुरू आहे. 

परंतु पूर्णा तालुक्यात  ई-पॉस मशीनचे सर्व्हर वारंवार डाऊन होत आहे. तसेच स्लो नेटवर्कमुळे लिंक फेल होऊन रेशन वितरणात अडचणी येत आहेत. परिणामी लाभार्थ्यांसह स्वस्त धान्य दुकानदारही त्रस्त झाले आहेत.  महिना सुरू झाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांनी मालाची उचल करून लाभार्थ्यांना धान्य वाटपास सुरूवात केली. गेल्या अनेक दिवसांपासून ई-पॉस मशीनचा सर्वर डाऊन झाल्यामुळे राशन वितरणाचे काम अत्यल्प वेळ चालत आहे.

 एका दुकानदाराला दिवसभराची फुरसत करून एक ते दोन ग्राहक करण्यासाठी एक ते दिड तासाचा वेळ लागत आहे. परिणामी दुकानासमोर लाभार्थ्यांची गर्दी होत असते. अनेकदा उद्भवणाऱ्या तांत्रिक दोषामुळे लाभार्थ्यांना धान्य वितरणात अडचणी येत असून बऱ्याच ठिकाणी राशन दुकानदार व लाभार्थ्यांमध्ये किरकोळ वाद होत आहेत. गरीब कुटुंबांना पुरेसे अन्न मिळावे, त्यांची

उपासमार होऊ नये यासाठी शासनाने अशा गरीब व सर्वसामान्य कुटुंबासाठी स्वस्त दरात राशन उपलब्ध करून देण्याची योजना अंमलात आणली गरीब कुटुंबांना स्वस्त दरात धान्य उपलब्ध करून दिले जाते. राशन धान्य वितरण व्यवस्थेत वापरण्यात येत असलेल्या ई-पॉस मशीनमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे धान्य वितरणाचे काम जेवढ्या गतीने व्हायला पाहिजे, तसे होताना दिसून येत नाही परिणामी स्वस्त धान्य दुकानदारांचाही बराच वेळ जात आहे त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सदर समस्या मार्गी लावावी, अशी मागणी दुकानदारांसह धान्य उचलणाऱ्या लाभार्थ्यांनी केली आहे. ग्राहक व दुकानदारांकडून तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला यासंदर्भात अनेक तक्रारी फोन द्वारे केला असून मात्र ई-पॉस मशीनबाबतच्या तांत्रिक समस्या मार्गी लावण्यात आल्या नाही.

 धान्य वितरण व्यवस्था अधूनमधून बंद पडत आहे. बायोमेट्रिक प्रणालीच्या वापरात खूप अडचणी येत आहेत सध्या दिवाळी असल्यामुळे सर्वसामान्यांना धान्य व आनंदाचा शिधा  न मिळाल्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जात आहे या सर्व गोष्टीवर तहसीलदार व पुरवठा विभागातील अधिकारी लक्ष न दिल्यामुळे या गोष्टी घडत आहेत अशी नागरिकांची चर्चा ऐकावयास मिळत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या