💥परभणी येथे समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने गरजू रुग्णाला रक्तदान....!


💥सय्यद मकदुम यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या अंतर्गत नांदेड येथून येऊन परभणीत केले रक्तदान💥

परभणी (दि.०६ आक्टोंबर) - परभणी येथे आज गुरूवार दि.06 ऑक्टोंबर परभणी शहरातील पवार हॉस्पिटल येथे अडमिट असलेल्या एका गरजू रुग्णाला O+ ची आवश्यकता होती तेव्हा सय्यद मकदुम यांनी समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या अंतर्गत नांदेड येथून येऊन परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील मेट्रो ब्लड बँक येथे रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले. सय्यद मकदुम यांनी आत्तापर्यंत 6 वेळा रक्तदान केले आहे. सय्यद मकदुम यांनी वेळेवर रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिल्या मुळे समाजहित अभियान प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोद अंभोरे, राज्य प्रसिध्दी प्रमुख शेख अझहर, रियाझ खुरेशी, रुग्णाचे नातेवाईक शेख मोईन यांनी सय्यद मकदुम यांचा पुष्पहार घालून यथोचित सत्कार केला. समाजहित अभियान प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष यांनी  सय्यद मकदुम यांनी रक्तदान केल्यामुळे त्यांचे धन्यवाद मानले व नागरिकांना रक्तदान करण्याचे आव्हान केले.

सदरील रक्तदान उपलब्ध करून देण्यात लोक श्रेय मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार, रयत मदत केंद्र चे संस्थापक बबन अण्णा मुळे, डॉ. राठोड मॅडम, ब्लड बँक कर्मचारी विठ्ठल शिंदे, माधव गोचडे, दीपक कंडेरे, अतुल जाधव, आत्माराम जटाळे, अनिल सावंत, किशोर जाधव, मारोती क्षिरजवार, प्रतिष्ठान चे मार्गदर्शक राहुल धबाले, बाळू भाऊ घीके, बालाजी कांबळे, सय्यद जमील, राजू कर्डिले आदींनी विशेष सहकार्य केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या