💥नूतन परिवाराचे कार्य अधिक लोकाभिमुख व्हावे - शंतनू सुभेदार

💥लोकजीवनात नूतनची स्वतंञ ओळख आपल्या सेवा, सर्मपणाच्या संकल्पातून सिध्दीस जात आहे💥                   

 नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेची स्थापना विधायक विचारांची शिकवण देत सुजाण नागरिक घडविण्याच्या उद्देशाने झाली.त्याकाळी माजीमंञी रावसाहेब जामकर, राजाभाऊ सुभेदार,ॲड. बाळासाहेब सुभेदार यांनी संस्थेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले.आज संस्थेचा लौकीक वाढीस लागला व सर्वदूर पसरला.जामकर आणि सुभेदार परिवाराच्या वतीने नूतन परिवारातील शिक्षक, शिक्षिका,कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनींना पुरस्काराने सन्मानित करण्याची परंपरा जतन केली.पुरस्काराने सन्मानित लोकांनी अधिक जबाबदारीने काम करत नूतन च्या लौकीकात भर घातली.लोकजीवनात नूतनची स्वतंञ ओळख आपल्या सेवा, सर्मपणाच्या संकल्पातून सिध्दीस जात आहे ही या पुरस्काराची फलश्रृती असल्याचे मत ॲड.किरणराव सुभेदार यांनी व्यक्त केले.

          कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय परभणी च्या स्व.प्रभाकरराव टाकळकर मालक सभागृहात आयोजित सुभेदार बंधु स्मृती सेवा गौरव पुरस्कार - २०२२ वितरण प्रसंगी ॲड.किरणराव सुभेदार बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर यांची उपस्थिती लाभली.प्रमुख अतिथी संस्थेचे सचिव विजयराव जामकर उपस्थित होते.व्यासपिठावर संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.किरणराव सुभेदार,डॉ.अभयराव सुभेदार,मंगेशराव सुभेदार ,सौ.कविताताई सुभेदार, सौ मृणालताई सुभेदार, सौ.मुग्धाताई सुभेदार, हर्षल सुभेदार,शंतनू सुभेदार, प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले, मुख्याध्यापक आर के चव्हाण,जी.एन.शिंदे,सौ.कविता ढेंगळे आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते स्व.राजाभाऊ सुभेदार, ॲड.बाळासाहेब सुभेदार,कै.सौ.कमलताई जामकर  यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.संगीत विभागाच्या प्रा.डॉ.पल्लवी कुलकर्णी आणि विद्यार्थीनींनी वैष्णव जन तो.. हे भजन सादर केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून प्राचार्य डॉ वसंतराव भोसले यांनी पुरस्कारा विषयी व शिष्यवृत्ती योजना विषयी माहिती दिली.

      दै.सकाळ घ्या वतीने सन ऑफ साॅईल हा अवार्ड मिळाल्या बद्दल शंतनू सुभेदार यांचा संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव जामकर यांच्या हस्ते शाल, भेट वस्तू,ग्रंथ भेट देवून गौरव करण्यात आला.

    गुरुजनांनी दिलेल्या संस्कारक्षम शिक्षणातून मी घडू शकलो. मी  नूतनचा विद्यार्थी असून मला सुंदर करीअर साठी लाभलेले मार्गदर्शन अधिक यशदायी जीवनशैली प्रदान करीत आहे ,त्याचाच एक भाग म्हणून मला दैनिक सकाळच्या वतीने देण्यात आलेला सन ऑफ सॉईल हा पुरस्कार खऱ्या अर्थाने माझ्या गुरुजनांचा गौरव आहे, असे सार्थ उदगार शंतनू सुभेदार यांनी काढले.

       शिक्षणात परिवर्तनाचे सामर्थ्य असते ,हा उदात्त हेतू लक्षात घेत गुरुजनांनी ज्ञानदाना सह समाजाला सहज सुंदर विधायक असे वळण लावण्याचे कार्य करावे, विद्यार्थ्यांनी शिक्षणातून चांगूलपणाचा ध्यास घेत राष्ट्रनवनिर्माण कामात योगदान द्यावे,या कामी स्व.सुभेदार बंधु सेवा गौरव पुरस्कार आत्मिक बळ देईल असा विश्वास अध्यक्षीय समारोपात विजयराव जामकर यांनी व्यक्त केला.

    स्व.सुभेदार बंधू स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा शिक्षकांनी साठीचा स्व.सुभेदार बंधू सेवा गौरव पुरस्कार- २०२२ प्रा.अरुण पडघन यांना  हेमंतराव जामकर यांचे हस्ते,प्रा.सुरेश रेंगे यांना ॲड.किरणराव सुभेदार यांचे हस्ते, मुख्याध्यापक जी.एन.शिंदे यांना डॉ अभयराव सुभेदार यांचे हस्ते,बी.एस.मोरे यांना विजयराव जामकर यांच्या हस्ते तर प्रशासकीय कर्मचारी डी.जी.रेंगे यांना मंगेशराव सुभेदार यांचे हस्ते,के.जे.विश्वाभरे यांना हर्षल सुभेदार यांचे हस्ते,पी.बी.गीरी यांना शंतनू सुभेदार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह,सन्मानपञ देवून गौरविण्यात आले.

         सोबतच सुगंधे पंकज नरेश,आडणे प्रेम विकास या विद्यार्थ्यांना  सन्मान पञ, मानचिन्ह, स्कूल बॅग व शालेय साहित्य देवून सौ.कविताताई सुभेदार,सौ.मृणालताई सुभेदार ,सौ.मुग्धाताई सुभेदार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले सूञसंचल व आभार उपप्राचार्य डॉ संगीता आवचार यांनी केले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या