💥पुर्णेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित 'शरद युवा संवाद यात्रे'ला उस्फुर्त प्रतिसाद...!


💥केंद्र सरकारणे 'अच्छे दिनाचे' स्वप्न दाखवून सत्ता मिळवली परंतू प्रत्यक्षात प्रचंड महागाई वाढवली - महेबुब शेख


पुर्णा (दि.१४ आक्टोंबर) - महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी आयोजित केलेली शरद युवा संवाद यात्रेचे आज शुक्रवार दि.१४ आक्टोंबर २०२२ रोजी पुर्णा येथे आगमन झाले या शरद युवा संवाद यात्रेला शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला शरद युवा संवाद यात्रेचे औचित्य साधून शहरातील जुना मोंढा परिसरातील गोंधळ सम्राट कै.राजाराम बापु कदम सांस्कृतिक सभागृहात सकाळी ११-३० वाजेच्या सुमारास युवकांशी संवाद साधतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख म्हणाले की "देशाला व राज्याला दिशा दाखवणारे एकमेव नेतृत्व देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारांचा जागर नव्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे याकरिता या शरद युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे पुढे बोलतांना त्यांनी केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेत म्हटले की केंद्र सरकारने जनसामान्यांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखवत सत्ता मिळवली परंतु प्रत्यक्षात प्रचंड महागाई वाढवली रुपयाचे अवमुल्यन केले सर्व जाती धर्मात तेड निर्माण करून भ्रम निराश केला दरवर्षी दोन कोटी युवकांना नौकरी देण्याचे दिलेले आश्वासन देखील पाळले नाहीअसेही ते म्हणाले यावेळी पुढे बोलतांना महेबुब शेख म्हणाले की केंद्र सरकारणे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवून नेण्याचा सपाटा लावल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या हाताचे काम जात आहे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय न घेता उद्योजकांचे भले करण्यातच केंद्र सरकार सार्थकता मानत आहे अशी टिका ही त्यांनी केली.


यावेळी स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका करतांना महेबुब शेख म्हणाले की जनतेने आपले लोकप्रतिनिधी निवडतांना तो शेतकऱ्यांची लुबाडणूक करणारा नसावा याची दक्षता घ्यायला हवी असेही ते म्हणाले यावेळी प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या हस्ते पुर्णा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या जनसंपर्क कार्याचे उद्घाटन करण्यात आले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भरत घनदाट,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राजेश विटेकर,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा  माजी जिल्हा परिषद सदस्य रितेश काळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी देसाई, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुर्णा शहराध्यक्ष प्रताप कदम,जिल्हा परिषद सदस्य गजानन अंबोरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाखेड विधानसभा अध्यक्ष तथा मा.पंचायत समिती सदस्य श्रीधर पारवे,माजी पंचायत समिती सभापती अशोक बोकारे,बाबा पठाण कार्याध्यक्ष पुर्णा. माजी नगराध्यक्ष जाकिर कुरेशी,माजी उपनगराध्यक्ष हाजी कुरेशी. माजी नगरसेवक शेख खुदुस शेख बशीर साहब,माजी नगरसेवक शेख शरीफ शेख नबी,माजी नगरसेवक अमजद नुरी, माजी नगरसेवक मधुकर गायकवाड.माजी नगरसेवक बालाजी कदम. माजी नगरसेवक महेबूब कुरेशी,दयानंद भाऊ कदम, युवा नेते इरशाद उर्फ इश्यू पठाण,प्रकाश ढोणे, इलियास चाऊस,नारायण कदम,रोफ बागवान,बाळू जोगदंड, विलास आबा कदम, विनोद कदम, अमोल पळसकर, संतोष पटाईतकर, गणेश इंगोले, प्रताप भैया कराळ आदींची उपस्थिती होती......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या