💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या अपडेट / बातम्या.....!


💥समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड,हिमाचल आणि गुजरातने केली विशेष समितीची स्थापना💥

✍️ मोहन चौकेकर

1. नागपुरात होणारा आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल , फॉक्सकॉन, एअरबस, सॅफ्रन... महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या उद्योगांच्या यादीत वाढच 

2. समान नागरी कायद्यासाठी उत्तराखंड, हिमाचल आणि गुजरातने केली विशेष समितीची स्थापना , 2024 च्या निवडणुकीपूर्वी देशभरात समान नागरी कायदा लागू होण्याची दाट शक्यता 

3. पैठणमध्ये वारकऱ्यांसाठी स्वतंत्र बँक सुरु होणार; मंत्री संदिपान भुमरेंची घोषणा, राज्यातील पहिलीच वारकऱ्यांची बँक ठरणार  

4. कैलास पाटलांचे उपोषण सातव्या दिवशी मागे, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर घेतला निर्णय 

5. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मराठवाड्यात 17 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; मदतीसाठी हवेत 2500 कटी

6. अमरावतीत जुनी इमारत कोसळली, दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपयांची मदत 

7. SRA घोटाळ्याबाबत वर्षभरापूर्वी तक्रार, पण ठाकरेंच्या दबावामुळे किशोरी पेडणेकरांविरोधात चौकशी नाही; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप 

8. 'मन की बात'मधून पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या छठ पुजेच्या शुभेच्छा; 

9. दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमधील हॅलोविन फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी, 151 जणांचा मृत्यू 

10.Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेत राहुल गांधींची मुलांबरोबर शर्यत; व्हिडीओ होतोय व्हायरल 

11.Belgaum News : मेसोपोटेमिया युद्धात अतुलनीय शौर्य गाजवलेल्या 114 मराठा बटालियनच्या सैनिकांना शरकत दिनी आदरांजली 

12.Edit Tweet Button : आता ट्वीट करा एडिट, इलॉन मस्क यांची भारतीयांना भेट 

13.देशातली पहिली हाय स्पीड वॉटर टॅक्सी मुंबईतून होणार सुरू, 200 प्रवाशांची असेल आसनक्षमता 

14.Samantha : सौंदर्यवती समंथाला जडला मायोसिटिस आजार  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या