💥बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर उमेदवारांची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी दरपत्रक सादर करण्याचे आवाहन...!


 💥मान्यताप्राप्त संस्था/कंपन्यांना प्रथम प्राधान्य💥

परभणी (दि.04 आक्टोंबर) : -  सहायक संचालक, नगर रचना, परभणी या कार्यालयातील वर्ग-4 शिपाई या रिक्त पदाचे कामकाज बाह्ययंत्रणेद्वारे कंत्राटी तत्वावर उमेदवारांची सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी मान्यताप्राप्त संस्था/कंपनी यांचेकडून सहायक संचालक, नगर रचना, परभणी या कार्यालयास एक वर्ग-4 शिपाई पदासाठी (किमान चौथी पास असणे आवश्यक आहे.) उमेदवाराची सेवा निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन देणे कामी दरपत्रक मागविण्यात येत आहेत. दरपत्रके सीलबंद पाकिटात बातमी प्रसिध्द झाल्यापासून दिनांक 11 ऑक्टोबर 2022 रोजी 5.00 वाजेपर्यंत या कार्यालयाकडे पोहचतील अशा बेताने पाठविण्यात यावे.

सदरील प्राप्त दरपत्रके दि. 12 ऑक्टोबर 2022 रोजी 12.00 वाजता उघडण्यात येईल. तसेच अटी व शर्ती   सहायक संचालक, नगर रचना, परभणी शाखा कार्यालय, सुपर मार्केट इमारत, पहिला मजला, कारेगाव रोड, परभणी - 431401 या कार्यालयाच्या सूचना फलकावर पहावयास मिळतील. असे शि. व्यं. जाधव, सहायक संचालक, नगर रचना, परभणी  यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या