💥काँग्रेस नेते सुरेश नागरे यांच्या उपस्थितीत असंख्य महिलांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश...!


💥काँग्रेस पक्ष वाढीसाठी सुरेश भैय्या नागरे यांच्या नेतृत्वात जोमाने काम करणार असल्याचे मनोगत व्यक्त💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतुर शहरातील असंख्य महिलांनी सुरेश भैय्या नागरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. नंदाताई भारशंकर, छायाताई मोहिते, शकुंतला वाकळे, कृष्णा भारशंकर, हेमाताई टाक, सूनिताताई रणखांब, इंदुताई मोहिते, अनिताताई मोहिते, असमा पठाण, सय्यद शकीना, पुष्पाताई मोहिते, कांताताई मोहिते, सुशीलाताई मोहिते, रीमाताई वाटोळे, सागरताई कांबळे, या महिलांचा काँग्रेस पक्षात प्रवेश झाला.

काँग्रेस पक्ष वाढीसाठी सुरेश भैय्या नागरे यांच्या नेतृत्वात जोमाने काम करणार असल्याचे मनोगत प्रवेश केलेल्या महिला कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या प्रसंगी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख, अविनाश काळे, राजेंद्र नागरे, केशवराव बुधवंत, जिंतूर महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा लक्ष्मीताई राठोड, डॉ निशांत मुंढे, बासू भाई, रेहमान भाई, मुखिद भाई, बाबू राज भाई, पप्पू टाकरस, महेश सुतार, नवनाथ घुगे, आदी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या