💥बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचा ३० आक्टोबर शेगावला मेळावा...!


💥एस एम देशमुख यांच्यासह परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार💥


बुलढाणा (प्रतिनिधी): मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्न असलेल्या बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हास्तरीय "संवाद मेळावा" व राज्यातील आणि जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा येत्या ३० ऑक्टोबर रोजी संतनगरी शेगाव येथे इंजीनियरिंग कॉलेजच्या हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

        ८३ वर्षाची प्रदीर्घ व वैचारिक परंपरा लाभलेल्या तथा मराठी पत्रकारांची मातृसंस्था म्हणून ओळखल्या जाणारया मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या अध्यक्षपदी नव्यानेच श्री. शरदजी पाबळे  यांची निवड झाली आहे.. याशिवाय उपाध्यक्ष म्हणून शरद काटकर   (पश्चिम महाराष्ट्र),श्रीमती शोभा जयपूरकर (राज्य महिला संघटक), अनिल महाजन ( राज्य जनसंपर्क प्रमुख), निवडणूक विभाग प्रमूख बाळासाहेब ढसाळ,  सुरेश नाईकवाडे, डिजीटल मिडीया प्रमूख अनिल वाघमारे,  तसेच  अमरावती विभागीय सचिव अमर राऊत यांच्यासह आठ विभागीय सचिव यांचा बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने व बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने सत्कार  करण्यात येणार आहे. 

      सोबतच बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचा जिल्हास्तरीय संवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य  विश्वस्त एस. एम. देशमुख , विश्वस्त  किरणजी नाईक  व राष्ट्रीय  अध्यक्ष शरदजी पाबळे साहेब हे उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करणार आहेत .  या मेळाव्याला बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी रविवार दिनांक ३० ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता संतनगरी शेगाव येथे इंजिनिअरिंग कॉलेज च्या हॉलमध्ये उपस्थित राहावे. असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, सरचिटणीस संदीप शुक्ला व कार्याध्यक्ष अजय बिल्लारी, सतीश आप्पा धुळे यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या