💥पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड राज्य मार्गावरील कॅनाल जवळ आढळला संशयास्पद स्थितीत अनोळखी इसमाचा मृतदेह...!


💥तालुक्यात चोवीस तासात आढळले दोन अनोळखी इसमांचे मृतदेह : या घटनेमुळे परिसरात माजली खळबळ💥

पुर्णा (दि.१५ आक्टोंबर) - तालुक्यातील मौ.निळा येथील पुर्णा नदीपात्रात काल दि.१३ आक्टोंबर २०२२ रोजी अनोळखी  इसमाचा मृतदेह मिळून आल्याची घटना ताजीच असतांना आज शनिवार दि.१५ आक्टोंबर २०२२ रोजी पुर्णा-नांदेड राज्यमार्गावरील गौर शिवारातील प्रकाश जोगदंड या शेतकऱ्याच्या शेतालगत असलेल्या पाटबंधारे विभागाच्या कॅनाल जवळ चुडावा पोलिस स्थानकाच्या हद्दीत एक अनोळखी इसमाचा संशयास्पद स्थितीतील डावा हात नसलेला मृतदेह आढळून आल्याची घटना घडली असून परिसरात दुर्गंधी सुटल्यामुळे सदरील घटना उघडकीस आली आहे.

 या घटने संदर्भात चुडावा पोलिसांनी माहिती कळविण्यात आल्याचे समजते सदरील अनोळखी इसमाचा आढळलेला मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असून मृतदेहाला डावा हात तोडल्याचे निदर्शनास येत असून त्याचे पोट देखील फाटलेल्या स्थितीत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यामुळे सदरील प्रकार घातपाताचा असल्याचे बोलले जात असून या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे....    

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या