💥नांदेड येथील सरदार जसपालसिंघ गाडीवाले यांचे दुःखद निधन.....!


💥त्यांच्या मागे कुटुंबात पत्नी,दोन मूलं,एक मुलगी,सून असा परिवार आहे💥

नांदेड (दि.26 ऑक्टोबर) : शीख समाजातील प्रतिष्ठित व्यक्तित्व, व्यावसायिक स. जसपालसिंघ गाडीवाले यांचे मंगळवार, दि.25 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी अल्पशा आजारने हैदराबाद येथे उपचारा दरम्यान निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांचे वय 49 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवार दि.26 आक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता  नांदेड येथील नगीनाघाट शमशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी समाजातील प्रतिष्ठित वर्ग, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येत उपस्थित होता. त्यांच्या मागे कुटुंबात पत्नी, दोन मूलं, एक मुलगी, सून असा परिवार आहे. 

.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या