💥अंतर जातीय विवाह योजनेचा नवबौद्धांना लाभ मिळवून देणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


💥सामाजिक न्याय योजनांचा जनजागर शिबिरा बोलतांना मंत्री आठवले यांनी केले प्रतिपादन💥

✍️ मोहन चौकेकर

 मुंबई (दि.१४ आक्टोंबर) - केंद्र सरकारच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा लाभ नवबौद्धांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज केले मुंबईत यशवंतराव प्रतिष्ठान केंद्रात भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाच्या विविध योजनांची माहिती देऊन अनुसूचित जाती  आणि ओबीसी वर्गात योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी सामाजिक न्याय योजनांचा जनजागर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात आठवले बोलत होते. 

जातीभेद निर्मूलनासाठी  केंद्र सरकारच्या आंतरजातीय विवाह योजनेत आंतरजातीय जोडप्यांना अडीच लाख रुपये केंद्रातर्फे अनुदान दिले जाते . या योजनेत हिंदू विवाह कायद्यानुसार लग्न झालेल्या आंतरजातीय  जोडप्यांना लाभ देण्यात येतो. या योजनेत नवबौद्ध तरुण-तरुणींनी आंतरजातीय लग्न केल्यास ते लग्न जर हिंदू विवाह कायद्यानुसार झाले नसेल तर केंद्र सरकारच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेचा नवबौद्धांना लाभ मिळत नाही ही अडचण लक्षात आल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुढाकार घेऊन ही अडचण दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. केंद्र सरकारच्या आंतरजातीय विवाह योजनेचा लाभ मिळण्यासाठी नवबौद्धांनी आंतरजातीय विवाह करताना बौद्ध पद्धतीने लग्न केले तर ते लग्न सुद्धा केंद्र सरकारच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेला पात्र ठरविण्यात यावे यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयात विचार विनिमय सुरू आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महाराष्ट्रातील नवबौद्धांना अनुसूचित जातीचा दर्जा देण्याचा निर्णय घेऊन केंद्राच्या अनुसूचित जाती च्या यादीत नवबौद्धांचा समावेश केला आहे. त्यानुसार आंतरजातीय विवाह योजनेत नवबौद्धांनाही लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.

अनुसूचित जाती ओबीसी दिव्यांग जन ज्येष्ठ नागरिक तृतीय पंथीय या सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी सामाजिक न्याय मंत्रालय कार्यरत असून देशात सर्वाधिक बजेट एक लाख 43 हजार कोटीचे बजेट आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात दलित विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह जेष्ठ नागरिकांसाठी ओल्ड एज होम नशा मुक्ती केंद्र व्हेंचर कॅपिटल स्कीम अशा अनेक योजना आहेत या योजनांचा लाभ दलित मागासवर्गीय तरुणांनी घ्यावा वेंचर कॅपिटल स्कीम द्वारे दलित तरुणांनी उद्योग उभारावेत तसेच सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे पारंपारिक उद्योग हे 90% अनुदान असणारी योजना राबवावी या योजनेतून उद्योग उभारावेत असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले सामाजिक न्याय मंत्रालयाच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यभर योजनांचा जागर सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून आपण करणार आहोत त्यासाठी महाराष्ट्रातल्या नागपूर अमरावती औरंगाबाद नाशिक पुणे ठाणे या सर्व विभागात योजनांचे जागर मिळावे आयोजित करण्यात करणार असल्याची घोषणा नामदार रामदास आठवले यांनी केली.  मुंबईत झालेल्या योजना जागर शिबिराला प्रचंड गर्दी उसळली होती. या कार्यक्रमाला समाज कल्याण सचिव सुमंत भांगे; समाज कल्याण प्रशांत नारनवरे ;सहसचिव दिनेश डिंगळे;महात्मा फुले मागासवर्गीय मंडळाचे प्रशांत गेडाम;  केंद्र सरकारचे अधिकारी  आनंद प्रकाश गुप्ता; अलियावर  जंग इन्स्टिट्यूटचे संचालक अरुण बाणेक; श्री. यादव; श्री. मिश्रा; श्री.शुक्ला आदि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; सुरेश बार्शीग  गौतम सोनवणे ; जगदीश गायकवाड;बाळासाहेब गरुड: संजय डोळसे; मंगेश सावंत; आदि अनेक मान्यवर  उपस्थित होते....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या