💥पुर्णेतील कै.विठ्ठलराव मोरे मूकबधिर शाळेत सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन साजरा...!


💥प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले💥        

पूर्णा - येथील कै. विठ्ठलराव मोरे मूकबधिर अस्थिव्यंग विद्यालयात महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

          प्रभारी मुख्याध्यापक विजय बगाटे यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागा अंतर्गत येणाऱ्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांच्या उपस्थित पालकांना सांगितली याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

          याप्रसंगी सौ. विमल पाटील, माधव नागठाणे, स्वाती जाधव, शे. नईम कुरेशी, विमलबाई दवणे, लक्ष्मण म्हेत्रे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अनिल क्षिरसागर यांनी केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या