💥परभणी शहरासह जिल्ह्यातून शिवसेनेच्या शिंदे गटाचे हजारो कार्यकर्ते मुंबईत मेळ्याव्यास उपस्थित राहण्यासाठी रवाना...!


💥धाडसी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे,महानगर अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते रवाना💥

परभणी (दि.०४ आक्टोंबर) :  मुंबईत दसर्‍या निमित्त आयोजित केलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यास उपस्थित राहण्याकरीता परभणी शहरासह जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते वाहनांद्वारे मुंबईस रवाना झाले आहेत.

 परभणी जिल्हा शिवसेना शिंदे गटाचे धाडसी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव शिंदे,महानगर अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते रेल्वेद्वारे तर काही कार्यकर्ते खास बसेसद्वारे, अन्य वाहनांद्वारे मुंबईस रवाना झाले आहेत. दरम्यान, मुंबईतील दसरा मेळाव्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या