💥सेवानिवृत्त कुंटूबांच्या वारसांना जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवा संघाचा आधार....!


💥जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवा संघाचे तालुका अध्यक्ष एम.के.कादरीचा सामाजिक बांधिलकी जोपासत पुढाकार💥

जिंतूर प्रतिनिधी  / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील सेवानिवृत्त कुटुंबातील वारसांच्या त्यांच्या न्याय हक्का साठी स्थानिक जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवा संघ नेहमी पुढाकार घेत असतो.

तालुक्यातील जि. प.बांधकाम विभागातील किशनराव शिवराम घोगरे यांचे 2 ऑक्टोंबर रोजी निधन झाले.ही दुःखद घटना माहिती होताच त्यांच्या पत्नीस पेंशनचा हक्क वेळेत भेटावा या उदात्त हेतूने जिल्हा परिषद सेवानिवृत्त सेवा संघाचे तालुका अध्यक्ष एम.कादरी यांनी तत्काळ

 9 ऑक्टोंबर रोजी मयत किशनराव घोगरे करंजी येथे यांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी रुक्मिणबाई यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. व कुटूंब सेवानिवृतीचा प्रस्ताव तयार करून घेण्यात आला.व सोमवारी 10 ऑक्टोंबर 2022 रोजी बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन पेंशन साठी पंचायत समिती येथे दाखल करण्यात येईल अशी माहिती कादरी यांनी दिली

    विशेषतः या सेवा संघाचे तालुका अध्यक्ष एम.के.कादरी अहोरात्र कष्ट घेत पेंशनरच्या विविध समस्या सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न करत असतात.वेळेत पेंशनरचे प्रस्ताव दाखल करणे,तालुक्यातील पेंशन पेशनधारकांना वेळेवर भेटावी या उद्देशाने कादरी हे स्वतः जिल्हा परिषद,पंचायत समिती आदी कार्यालयास भेटी संबधित अधिकारी,कर्मचारी यांच्याशी संपर्क ठेवणे आदी कार्य करत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तालुक्यातील पेंशनधारकांना न्याय देण्याचा सातत्याने कादरी हे प्रयत्न करत असतात.घरबसल्या सर्व पेंशनरधारकांना माहिती वेळेवर उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने त्यांनी एक व्हाटसअप ग्रुप सुद्धा तयार केलेला असून या ग्रुप वर माहितीची देवाणघेवाण सहजतेने उपलब्ध होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या