💥पुर्णा तालुक्यात 'गाढवांचा गोंधळ लाथांचा सुकाळ' वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांचा ठरतोळ काळ....!


💥तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासह विविध मार्गांवर मोकाट गाढवांसह मोकाट जनावर ठरताय वाहन चालकांसाठी डोकेदुखी💥


पुर्णा (दि.२६ आक्टोंबर) - पुर्णा तालुक्यात सर्वत्र 'गाढवांचा गोंधळ अन् लाथांचा सुकाळ' अशी परिस्थिती निर्माण झाली असून शेकडोच्या संख्येत असलेल्या या मोकाट गाढवांच्या टोळ्या शहरातील विविध मार्गांसह मुख्य बाजारपेठ तसेच नागरी वसाहतींमध्ये रात्रंदिवस धुमाकूळ घालीत वाहन धारकांसह नागरिकांसाठी अक्षरशः डोकेदुखी ठरत असतांना मात्र महसुल व पोलिस प्रशासनासाठी अक्षरशः एटीएम ठरत असल्याचे बोलले जात असून त्यामुळेच या मोकाट गाढवांना कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याचे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळले जात आहे.  


याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शहरात रात्रंदिवस अक्षरशः कर्णकर्कश आवाज काढीत एकमेकांच्या मागे धावणारे गाढव दिवसा रस्त्याने फिरणे तर रात्रीच्या वेळेला सुखाने झोपने देखील मुश्कील करीत असून सार्वजनिक रस्त्यांवर धुमाकूळ घालत दुचाकी वाहन चालकांच्या अपघाताला कारणीभूत ठरत आहे तर पुर्णा-नांदेड,पुर्णा-ताडकळ,पुर्णा-झिरोफाटा-परभणी राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गांवर जड वाहनांसमोर येवून स्वतःच्या देखील मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत.

पुर्णा-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर मागील दोन दिवसात अज्ञात वाहनाला धडकून दोन गाढवांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून या घटनेत दि.२५ आक्टोंबर २०२२ रोजी मध्यरात्री ताडकळस फाटा याठिकाणी तर आज २६ आक्टोंबर २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास धनगट टाकळी फाटा परिसरात अज्ञात वाहनाच्या धडकेत पुन्हा एक गाढवाचा मृत्यू झाल्याची घटना घडली सदरील दोन्ही गाढव एखाद्या जड वाहनाला धडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पुर्णा शहरासह तालुक्यात मोकाट गाढवांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली असून या मोकाट गाढवांच्या सोबतच मोकाट गुरढोर देखील दुचाकी चालक तसेच अन्य वाहन चालकांसह पादचाऱ्यांसाठी देखील वेळोवेळी धोकादायक ठरत असून या मोकाट गाढवांच्या धडकेत अनेक लोक जखमी झाल्याचे तर काहींची हाड मोडल्याचे गंभीर प्रकार देखील समोर आले असून अशीच गंभीर घटना मागील दोन/तिन महिण्यापुर्वी घडली होती तालुक्यातील मौ.कंठेश्वर येथील सतिष भारती हा युवक झिरो टी पॉईंट परिसरात रस्त्याच्या बाजूला उभा असतांना परिसरात गोंधळ घालणाऱ्या गाढवांनी या युवकाला पाडल्यामुळे तो गंभीर जख्मी झाला होता अश्या प्रकारे शहरासह संपूर्ण तालुक्यात गाढव रात्रंदिवस धुमाकूळ घालीत असल्यामुळे वाहन धारक/चालकांसह सर्वसामान्य नागरिक अक्षरशः आपला जिव धोक्यात घालून वावरतांना दिसत आहेत.......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या