💥पुर्णा तालुक्यात सर्वदुर परतीच्या पावसाने माजवला हाहाकार....!


💥वादळी वाऱ्यासह बरसलेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला💥


पूर्णा (दि.१५ आक्टोंबर) - तालुक्यात सर्वदुर परतीचा पाऊस दुपारनंतर आचानक वातावरणात बदल होत विजा चमकत ढगांचा गडगडाट वादळी वार्यासह जोरदार पाउस पडत आहे.


       सोयाबीन पिक हे ९० दिवसाचे असल्याने मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने आज १०५ दिवस झाले आहेत . म्हणुन शेतात उभे पिक ठेवले तर फुटुन जाते म्हणुन १०ते पंधरा शेतकरी व मजुर एकत्र येत सकाळी लवकर लागुन सोयाबीन कापत आहेत . (ता १४) शुक्रवार दुपारनंतर जोरदार पाउसाने हजेरी लावली जमा करणे झाले नाही वावरात तसेच कडपे वाहुन जात आहेत काही जमीनीच्या उतारानुसार पान्यावर तरंगत आहेत . पावसाळ्यात असा मोठा जोरदार पाउस पहीलाच आहे . ग्रामीण भागात शेतात गेलेले शेतकरी ओढ्याला नदीला पुर आल्याने गावकडे येन्याचे मार्ग बंद झाले आहेत . विजा चमकत आहेत . वातावरण भितीचे तयार झाले .काळेकुट्ट ढग आल्याने  दिवसाच अंधार पडला होता .वर्षेभर एकाच पिकावर उदरनिर्वाह करावा लागतो तेच पिक जात आहे त्यामुळे आशेने पाहीलेले सर्व स्वप्न अधुरे राहनार चित्र दिसत आहे अत्यंत वातावरण अद्यापही भितीचे आहे पूर्णा शहरात सर्व रस्ते पान्याने तुडुंब भरुन वाहत होते अनेक दुकानात पानी शिरले कारन पावसाचा जोम खुपच वेगाने होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या