💥प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत लाभ घेण्याचे आवाहन....!


💥असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे💥

परभणी (दि.04 आक्टोंबर) : - जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत माहे ऑक्टोबर 2022 व माहे नोव्हेंबर 2022 चे तालूका निहाय लाभार्थी संख्येनुसार संबंधीत तहसिलदार यांना धान्य वाटपाकरीता योजना निहाय गहू व तांदूळ चे नियतन पाठविण्यात आलेले आहे. 

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत प्रतिव्यक्ती 3 किलो गहू व 2-किलो तांदूळ मोफत नियमित नियतना व्यतिरिक्त असलेल्या धान्याचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे तालुक्याचे संबंधीत रेशन धान्य दुकानदार यांचेशी संपर्क साधून शासन नियमानुसार देय सदर धान्य मोफत प्राप्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या