💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील मार्केट यार्डमध्ये ओंकार गृहउद्योग अंतर्गत "शुद्ध सेंद्रिय लाकडी तेल घाण्याचे उद्घाटन...!


💥"शुद्ध सेंद्रिय लाकडी तेल घाण्याचे उद्घाटन वसंतराव नाईक कृषी विद्यापिठाचे कुलगुरू इंद्र मनी यांनी केले💥


पूर्णा (दि.२६ आक्टोंबर)
- शेतीत काबाडकष्ट करुन पिकवनारा खुश नाही - खरेदी करुन खानाराही खुश नाही - मधला वर्ग खुश आहे मात्र समाधानी नाही म्हणून तिघांनाही खुश ठेवण्यासाठी जो जास्त काबाडकष्ट करतो कर्तव्य जानतो प्रामाणिक रहा त्यालाच नियती समाधानकारक झोपु देते असे प्रतिपादन वसंतराव ना.म.कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू इंद्र मनी यांनी केले .

         ताडकळस येथिल मार्केट यार्डमध्ये ओंकार गृहउद्योग अंतर्गत "शुद्ध सेंद्रिय लाकडी तेल घाणा" उदघाटन प्रसंगी कुलगुरू इंद्र मनी बोलत होते .कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी पुणे संजय पवार , आधिष्ठाता डी .बी .देवसरकर ,तहसीलदारनागपुर श्रीराम मुंदडा , सभापती अजित वरपुडकर,रंगनाथ भोसले,ॲड.बालाजी चिमटे , सुधाकर खराटे,सौ.चेतना पवार नंदकुमार मुंदडा,केशवराव पारवे , पंडित थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. 

        पुढे बोलतांना उपजिल्हाधिकारी पुणे संजय पवार म्हणतात एका दाण्याचे हजार दाणे देनारा व्यवसाय करनारा शेतकरी राजा अडचणीत सापडतो म्हणून खर्च किती उत्पादन किती याचा हिशोब ठेवून शेतीला जोडव्यवसाय करणे काळाजी गरज आहे . कार्यक्रमात जिल्ह्यातील उपक्रमसिल शेतकरी भाजीपाला उत्पादक पंडीत थोरात , गोपालन रत्नाकार ढगे , हळद  प्रक्रिया प्रकाश हरकळ , तुप उत्पादक रामेश्वर साबळे  बालासाहेब हिंगे , कोसला उत्पादक मधुकर जोगदंड , गवतापासुन इंधन निर्मिती प्रकल्प नारायण धवन , मृदंग तबला हार्मोनियम उत्पादन मारुती आवरगंड , महाजन आवरगंड , बियाणे शुध्दीकरण प्रकल्प गजानन नाईकवाडे ,गोविंद दुधाटे,नरहरी रुद्रवार , विजयकुमार लिंगायत , सुदाम देवुळगावकर , , मोतीराम दुधाटे , सुरेश मगरे , जवळेकर स्वामी धम्मपाल हनवते अदी उत्कृष्ट लघूउद्योग पूर्णत्वास नेनार्या शेतकरी बांधवांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमामध्ये जनार्धन आवरगंड यांनी गृह उद्योगा अंतर्गत बंनवलेले लोणचे , दाळी , विविध पापड , चटण्या , लाडू, सुंगधी उटने अदीची कुलगुरु इंद्र मणी यांनी पाहणी केली कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक जनार्धन आवरगंड यांनी केले सूत्रसंचालन डॉ. दिलीप शृंगारपुतळे यांनी केले . आभार प्रदर्शन कृषी साहाय्यक सुरेश काळे यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या