💥जिंतूर तालुक्यातील कवडा येथे शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध स्थापना.....!


💥नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी डॉ.रवींद्र कडूजी दराडे यांची बिनविरोध निवड💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.०७ आक्टोंबर) : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडा येथे दि. ७ वार शुक्रवार रोजी, सकाळी १०:००  वा.  रमणीय आनंददायी वातावरणात शाळेच्या सुसज्ज इमारतीत शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यासाठी पालक सभा बोलवण्यात आली. या सभेत विचार विनिमय करून एकमताने नवीन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी डॉ.रवींद्र कडूजी दराडे यांची बिनविरोध स्थापना करण्यात आली.


          याप्रसंगी कवळा येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कडूजी दराडे, सौ. शोभा रामेश्वर चव्हाण, मदन विठ्ठल चव्हाण, सौ. संगीत संजय राठोड, बाळू रामभाऊ आढे, पांडुरंग बाबाराव काळे, संजीवनी जिवाजी प्रधान, दत्ता बापूंना मोरे, सौ. सुलोचना अतुल चव्हाण, सौ. साधना रामेश्वर पांढरे, गजानन देविदास नागरे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. 

        याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मारोती घुगे सह सर्व शिक्षक व कवडा कवडा येथील गावकरी यांनी डॉ. दराडे व सर्व सदस्यांची शाळेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने हार व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडा शाळा व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड केल्याबद्दल मुख्याध्यापक मारोती घुगे यांनी सर्व पालकांचे आभार व्यक्त केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या