💥ग्रंथालय व माहिती शास्त्र या विषयामुळे ज्ञानाच्या कक्षा वाढतात - प्रा.डॉ.संदीप गायकवाड


💥येथील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील अभ्यास मंडळाच्या उद्घाटनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते💥

पूर्णा (प्रतिनिधी - दि.२१ आक्टोंबर) - ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा वाढतात तसेच ग्रंथालय शास्त्राच्या अध्ययनाने वाचन व ज्ञानग्रहण करण्याची सवय लागते असे प्रतिपादन पीपल्स महाविद्यालय येथील ग्रंथपाल प्रा.संदीप गायकवाड यांनी केले. 

 येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील ग्रंथालय व माहितीशास्त्रीय विभागाच्या अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे हे होते.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या भितीपत्रकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालय व माहिती शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ.अशोक कोलंबकर यांनी मांडले तर प्रा.दत्ता पवार यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम दीपके यांनी केले व आभार गीता कदम यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारीव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभम दिपके,संतोष भिसे,गोवर्धन कदम, गीता कदम आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या