💥पुर्णेतील कर्तव्यतत्पर अधिकारी पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांचा मुस्लीम बांधवांनी केला सत्कार...!

💥ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त काढण्यात धार्मिक जुलूसा दरम्यान करण्यात आला सत्कार💥

पुर्णा (दि.१० आक्टोंबर) - पुर्णा पोलिस स्थानकाचे कर्तव्यतत्पर कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांनी पुर्णा पोलिस स्थानकाचा पदभार स्विकारल्यापासून पुर्वी शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा वेळोवेळी उपस्थित होणारा प्रश्न त्यांच्या कारकिर्दीत कायमस्वरूपी मिटला असल्याचे निदर्शनास येत असून त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर शहरासह तालुक्यातील व्यापारी,प्रतिष्ठित नागरीकांसह सर्व धर्मिय समाजातील जनसामान्यांना एक खंबीर आधार निर्माण झाल्याचे निदर्शनास येत असल्यामुळे पोलिस प्रशासनाप्रती सर्वसामान्य जनता आदर व्यक्त करतांना दिसत आहे.


याच पार्श्वभूमीवर काल रविवार दि.०९ आक्टोंबर २०२२ रोजी ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त मुस्लीम बांधवांनी काढलेल्या भव्य धार्मिक जुलूसा दरम्यान पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांचा मुस्लीम बांधवांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला वेळोवेळी शहरासह तालुक्यातील धार्मिक/जातीय सलोखा नेहमी जपण्याचे अत्यंत मोलाचे कार्य आपण करीत आहात वेळोवेळी  सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन आपण सर्वसामान्य जनतेच्या मनात आपल्या कर्तृत्वातून सर्वसामान्य जनते मध्ये पोलिस प्रशासना प्रती विश्वासाचे वातावरण निर्माण केले त्यामुळे आपण सत्कारास पात्र ठरल्यामुळे आपला सत्कार करण्यात येत असल्याचे या सत्कारा वेळी मुस्लीम बांधवांनी म्हटले यावेळी सर्व मुस्लिम बांधवांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रताप भैया कदम,राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्ष बाबा पठान,सामाजिक कार्यकर्ते हबीब साहब यांच्यासह अनेक पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या