💥पूर्णा येथील जिल्हा परिषद केंद्रीय कन्या शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड.....!


💥शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष पदावर म.जमील बाबूमिया यांची तर उपाध्यक्षपदी हबीबखान अहमदखान यांची निवड💥

पूर्णा (दि.११ आक्टोंबर) - येथील केंद्रीय कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीची आज मंगळवार दि.११ ऑक्टोबर २०२२ रोजी एका विशेष पालकसभेत बिनविरोध निवड करण्यात आली आहे या सभेसाठी केंद्रप्रमुख सय्यद सर,तज्ञ शिक्षक दिलीप शृंगार पुतळे,केंद्रीय मुख्याध्यापक रेखाताई जोंधळे,माजी अध्यक्ष अनिस बाबूमिया आदींची व्यासपीठावर उपस्तिथी होती.


यावेळी सर्वानुमते म.जमील बाबूमिया यांची अध्यक्षपदी तर हबीबखान अहमदखान यांची उपाध्यक्षपदी टाळ्यांच्या गजरात निवड करण्यात आली.दरम्यान यावेळी नवनियुक्त अध्यक्ष आणि शालेय शिक्षण समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आलाय,नवनियुक्त शिक्षण समितीकडून भरघोस कार्य व्हावे अशी अपेक्षा यावेळी पालकांनी व्यक्त केली आहे...

कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी केंद्रीय मुख्यध्यापक रेखाताई जोंधळे आणि त्यांचे सहकारी भोकरे अनंता, श्रीमती दासरवार पी. एल.,साने व्ही.सी.,बोगळे एस.टी. व विशेष शिक्षक कैलास शिंदे आदींनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या