💥सरकारच्या भांडवलशाही धार्जिण्या धोरणामुळे लोककल्याणकारी राज्याचा संकोच होतो आहे - प्रा.डॉ.बाजीराव वडवळे


💥लोकप्रशासन विभागाच्या अभ्यास मंडळाच्या उद्घाटन व प्रबोधन या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते💥

पूर्णा.(दि.१७ आक्टोंबर) - आजच्या सरकारमध्ये भांडवलशाही धार्जिन्या धोरणामुळे लोककल्याणकारी राज्याचा संकोच संकोच होतांना दिसतो आहे असे प्रतिपादन पीपल्स महाविद्यालय, नांदेड येथील लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा.डॉ. बाजीराव वडवळे यांनी केले.ते येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाच्या अभ्यास मंडळाच्या उद्घाटन व प्रबोधन या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संतोष कुऱ्हे हे होते. पुढे बोलताना डॉ. वडवळे म्हणाले की लोककल्याणकारी राज्यात अन्न,वस्त्र , निवारा,शिक्षण व सांस्कृतिक उपक्रम यांची जबाबदारी शासन घेते.०१ ते१४ वर्षापर्यंत मुलांना सक्तीचे शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. परंतू शासनाने मोठ्या प्रमाणात खाजगी इंग्रजी शाळांना मान्यता दिल्यामुळे   शिक्षणाचा बाजार सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. कुशल लोकांना संधी पासून वंचित ठेवण्याचे काम आज मोठय़ा प्रमाणात चालू आहे.येणाऱ्या पिढीला नोकरीची संधी उरलेली नसून हे सरकारचे अपयश भावी पिढीसाठी अत्यंत घातक असल्याचेही ते यावेळी म्हणाले. आज बळी तो कान पीळी अशी अवस्था समाजात असतांना येणाऱ्या काळात सामाजिक न्याय व लोककल्याणकारी राज्याची संकल्पना टिकेल की नाही याविषयीची चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जळबा हटकर यांनी केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संपादीत केलेल्या भितीपत्रिकाचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन विद्यार्थी संपादक शितल कर्हाळे यांनी केले तर आभार प्रा.अतुल शिंदे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या