💥विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन....!


💥 या योजनेमध्ये संपुर्ण कर्ज संबंधित बँकेमार्फत दिले जात आहे💥

परभणी (दि.17 आक्टोंबर) : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना बँके मार्फत राबविण्यात येत असून, सदर कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा देशातंर्गत व परदेशी उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी राबविण्यात येत आहे.

 या योजनेमध्ये संपुर्ण कर्ज संबंधित बँकेमार्फत दिले जात असून, विद्यार्थ्याने बँकेच्या कर्जाची परतफेड नियमीतपणे केल्यास 12 टक्के पर्यंतची व्याज परतावा रक्कम दरमहा महामंडळ लाभार्थ्याच्या बँक खात्यावर जमा करणार आहे. ही योजना ऑनलाईन स्वरूपाची असुन त्यासाठी महामंडळाच्या वेबसाईट www.msobcfdc.org.in या संकेतस्थळावर मुळ कागदपत्रे अपलोड करुन प्रस्ताव ऑनलाईन दाखल करावा. अधिक माहितीसाठी महामंडळाचे जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, परभणी दूरध्वनी क्र. ०२४५२-२२७६१५ यांच्याशी संपर्क साधावा.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या