💥संविधानानुसार सर्व धर्म समान ; हिंदू धर्मियांच्या भावना दुखविणे चूक - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


💥दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल मंत्रिमंडळातील राजेंद्र पाल गौतम या मंत्र्याने राजीनामा दिला ते योग्यच असेही आठवले म्हणाले💥✍️ मोहन चौकेकर 

मुंबई (दि.12 आक्टोंबर) - आपल्या धर्माचा अभिमान जरूर बाळगावा मात्र इतरांच्या धर्माचा आणि त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर राखला पाहिजे हीच खरी धर्मनिरपेक्षता असून संविधानानुसार  सर्व धर्म समान आहेत. त्यामुळे हिंदू धर्मावर टीका करणे आणि हिंदू धर्मियांच्या भावना दुखविणे हे चुकीचे आहे.  सर्वधर्मसमभाव आणि सहिष्णुतेला हरताळ फासणारे आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील  राजेंद्र पाल गौतम या मंत्र्याने राजीनामा दिला ते योग्यच झाले. कोणत्याही धर्मीयांच्या भावना दुखविणे ही घटनेतील मूल्यांची पायमल्ली असे मत व्यक्त रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले. 

दिल्लीतील मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी हिंदू धर्माविरुद्ध वक्तव्य केल्यानंतर उठलेल्या वादळामुळे त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. याप्रकरणी खरे तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोषी आहेत. भारतीय संविधानाने दिलेल्या सर्वधर्मसमभाव बंधुता सहिष्णुता या तत्वांना अरविंद केजरीवाल मानत नाहीत. त्यांनी आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांची वक्तव्ये ही एखाद्या धर्माविरुद्ध राहिली आहेत.अरविंद केजरीवाल हेच घटनाविरोधी आहेत. देशात सर्वधर्मसमभाव ; सहिष्णुता वर्धित करून बंधुभाव वाढविला पाहिजे. त्यातूनच आपले सामाजिक ऐक्य  आणि राष्ट्रीय एकात्मता मजबूत होईल. विविधतील आपली एकता टिकून आहे ती संविधानामुळे!संविधानातील मूल्यांमुळे! मात्र जर अरविंद केजरीवाल आणि त्यांचे आमदार एखाद्या धर्माविरुद्ध जाहीर बोलू लागले तर  सर्वधर्मसमभाव या घटनेतील मूल्यकगी पायमल्ली होऊन सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे आशा प्रवृत्ती च्या अरविंद केजरीवाल यांना जनतेने धडा शिकविला पाहिजे. असा टोला ना.रामदास आठवले यांनी लगावला. 

आम आदमी पक्षाच्या गुजरातचे  अध्यक्ष गोपाल इटलीया याने  पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अत्यंत वाईट असंविधानिक शब्द उच्चारले आहेत. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरे संविधानपूजक असून संविधानानुसार देश चालवीत आहेत.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे ते नेते आहेत. मोदी गुजरात चे मुख्यमंत्री असताना त्यांच्या शासकीय निवासस्थानी बुद्ध मूर्ती आहे. मोदींच्या गावात वडनगर येथे ह्यू इन त्संग हे येऊन गेले होते. तिथे बुद्धिस्ट मॉनेस्ट्री आहे. त्यामुळे पंतप्रधान  मोदी यांच्या वर बौद्ध धम्माचे संस्कार असून बौद्ध धम्म आणि आंबेडकरी विचार त्यांना उमगला असून त्यानुसार ते सर्वधर्मसमभाव मानणारे राष्ट्रीय एकात्मता मजबूत करणारे पंतप्रधान आहेत असे ना.रामदास आठवले म्हणाले.

मात्र अरविंद केजरीवाल आणि त्यांची आम आदमी पक्षाची टीम ही घटनेची पायमल्ली करून  एकात्मतेला धोका निर्माण करायचे काम करीत आहेत.त्यांना जनतेने धडा शिकविला पाहिजे असे ना.रामदास आठवले म्हणाले.....

✍️ मोहन चौकेकर

**********************************************

एक झुंजार व निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जात असलेले अजित न्युज हेडलाईन्सचे संपादक मा.दिनेशभाऊ चौधरी यांचे चिरंजीव अजितभाऊ दिनेश चौधरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख "🎂🎂💐💐

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या