💥पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांची परतीच्या पावसाने उडवली झोप...!


💥सोयाबीन,कापूस पिकाचे अतोनात नुकसान,कडब्याच्या गंजिवर वीज पडून शेतकऱ्याचे मोठे नुकसान💥

[जोरदार पावसात अचानक वीज पडून येथील शेतकरी नागनाथ रेंगे यांची कडब्याचि गंजी जळुन खाक झाली] 

 पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे परिसरात दी.14 ऑक्टोबर पासून सलग चार दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून  दी .18 ऑक्टोबर रोजी दुपारी चार च्या सुमारास वातावरणात बदल होत मुसळधार पाऊस चालू होता यातच येथील शेतकरी नागनाथ रेंगे यांच्या शेतातील कडब्याच्या ओळइ (गंजी) वर वीज पडून पूर्ण ओळइ(गंजी) जळुन खाक झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न कसा सोडवावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.


या संकटातून जीवित हनी टळली . जोरदार पावसाने परिसरातील गोदावरी  नदी सह छोटे मोठे ओढे दुथडी भरुन वाहत आहेत .दिग्रस बंधारा तुडुंब भरला असून सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. सद्यस्थितीत सोयाबीन,कापूस,तुर पिकांचे तसेच फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी कापलेले सोयाबीन जोरदार पावसाने वाहून गेले आहे तर उभे असलेल्या सोयाबीन शेंगास अंकुर फुटले आहेत त्या सोबतच शेतकऱ्याचे नगदी पीक असलेले कापूस पीक चांगल्या प्रकारे बोंड फुटून वेचनिस आला होता परंतु  सततच्या जोरदार पावसाने कापसाचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीन पीक काढणीला आले असतानाच  पावसाच्या जोरदार फटक्यामुळे हता तोंडाशी आलेले पीक शेतकऱ्याच्या हातून गेल्यामुळे परिसरातील मुंबर, गोळेगाव,धानोरा काळे, बानेगाव,कळगाव येथील शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने अद्यापही पंचनामे केले नसून. तात्काळ सरसगट पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी,जोरदार पावसाने नुकसान झालेल्या पिकाचा पीकविमा तात्काळ मंजूर करावा अशी मागणी परिसरातील  शेतकरी करत आहेत.

-------------------------------------------------------------------

प्रतिक्रिया :-

धानोरा काळे शिवारात गेले चार  दिवसापासून जोरदार होत असलेल्या पावसाने सोयाबीन ,कापूस ,तुर पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे तरी तात्काळ   नुकसानीची पाहणी करून सरसगट शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी.

 राम अंबादास काळे, शेतकरी,धानोरा काळे,ता.पूर्णा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या