💥आई वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण न झाल्याने युवकाची आत्महत्या...!


💥देऊळगाव जहाँ येथील युवकाची पुण्यात गळफास💥

शिवशंकर निरगुडे :- हिंगोली 

हिंगोली - आज देशात शासकीय नोकर भरत्या ठप्प झाल्याने लाखो करोडो मुलं शिकून बेरोजगार झाले आहेत तर ग्रामीण भागातील शिकलेल्या मुलांच्या हाताला काम मिळत नसल्याने अनेक सुशिक्षित तरुण मुलं नोकरीच स्वप्न उराशी बाळगून शहराकडे धाव घेत आहेत.

मात्र शहरात जाऊन सुध्दा बाळगलेले स्वप्न पूर्ण होत नसल्याने या नैराश्येतून अनेक तरुण युवक आपले जीवनच संपवून टाकीत असल्याच्या घटना घडत आहेत.हिंगोली जिल्ह्यातील देऊळगाव जहाँ येथील सुशिक्षित युवकाने आपल्या आई वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण न करता आल्याने पुणे येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दिवाळी सणाच्या एक दिवस अगोदर ता.२३ रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.

मयत देऊळगाव जहाँ येथील रामेश्वर भारत कांबळे वय २३ वर्ष हा युवक आपल्या घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असल्याने तो बारावी पास होऊन पुणे या ठिकाणी कंपनीत काम करत शिक्षण व पोलिस,व आर्मी भरतीची तयारी करीत होता मागील तीन चार वर्षात त्याने अनेक भरत्यामध्ये सहभाग देखील घेतला होता मात्र यामध्ये त्याला यश मिळाले नाही.आपण आई वडिलांना दाखवलेले स्वप्न पूर्ण करु शकलो नाही आता गावाकडे कोणते तोंड घेऊन जावे याच नैराश्येतून युवकाने आई वडिलांच्या नावे एक चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आपली जिवनयात्रा संपविली आहे.मयताच्या पश्चात आई वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

* नेमके काय लिहले होते चिट्ठी मध्ये लिहून :- 

आई पप्पा दादा मला माफ करा

मी तुम्हाला दाखविलेले स्वप्न पूर्ण करु शकलो नाही मला आता पुढचा रस्ता दिसत नसल्याने हाच मला शेवटचा पर्याय वाटत आहेमाझ्यामुळे कुणाचे मन दुखावले गेले असल्यास मी सर्वांची माफी मागतो मला माफ करा

Sorry

अशा आशयाची चिठ्ठी गळफास घेतलेल्या ठिकाणी आढळून आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या