💥पुर्णा पोलिस स्थानकाच्या हाकेच्या अंतरावरील भर बाजारपेठेतील विदेशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडले...!


💥तब्बल दोन लाख रुपयांच्या विदेशी दारुचे २१ बॉक्स चोरट्यांनी पळवले💥


पुर्णा (दि.०६ आक्टोंबर) - पुर्णा पोलिस स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य बाजारपेठेतील स्वामी दयानंद सरस्वती चौक परिसरातील 'जैस्वाल वाईन शॉप' या दारूच्या दुकानावर चढून दुकानावरील पत्रांसह लोखंडी जाळी कापून चोरट्यांनी विदेशी महागड्या दारूचे तब्बल २१ बॉक्स अंदाजित किंमत २ लाख रुपयांचा मुद्देमाल पळवल्याची घटना आज गुरूवार दि.०६ आक्टोंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.


पुर्णा शहरातील चिकन/मटन/मच्छी मार्केटसह देशी/विदेशी दारू विक्रीसाठी प्रसिध्द असलेला हा मुख्य बाजारपेठेतील स्वामी दयानंद सरस्वती चौक परिसर रेल्वे स्थानक क्रमांक चार लगतच्या तडिपार परिसराला लागूनच असून या निर्मनुष्य तडिपार परिसरात रात्रंदिवस राज्यासह अंतरराज्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींची वरदळ असते या परिसरात मागील पंधरा दिवसापुर्वी एका १९ वर्षीय तरुणीची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली होती या घटनेला पंधरा दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच रेल्वेच्या सुरक्षा भिंतीलगत असलेली ही 'जैस्वाल वाईन शॉप' चोरट्यांनी मागील बाजूने फोडून तब्बल दोन लाखांचा विदेशी दारू साठा पळवल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की नवरात्र महोत्सव सुरू असल्यामुळे जैस्वाल वाईन शॉप मालक रवि रतनलाल जैस्वाल यांनी दि.०४ आक्टोंबर २०२२ रोजी दिवसभर व्यवसाय करून रात्री १०-०० वाजेच्या सुमारास दुकान बंद केले दुसऱ्या दिवशी दि.०५ आक्टोंबर २०२२ रोजी दसरा सन असल्यामुळे शासन निर्देशानुसार दुकान बंद ठेवण्यात आले होते त्यामुळे आज गुरूवार दि.०६ आक्टोंबर २०२२ रोजी सकाळच्या सुमारास रवि जैस्वाल यांनी आपले वाईन शॉप उघडले असता त्यांना दुकानातील  विदेशी दारूचे २१ बॉक्स चोरी झाल्याचे निदर्शनास आले ज्याची किंमत २ लाख रुपये आहे यावेळी रवि जैस्वाल यांनी या चोरीच्या घटने संदर्भात पुर्णा पोलिस स्थानकाचे पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पो.नि.मारकड व सहकारी पथकातील सपोनि.अश्रोबा घाटे,पोहेकॉ.बंडू राठोड यांनी तात्काळ घटनास्थळावर धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या