💥वाचन माणसाला विशाल दृष्टी देत अधिक समृद्ध बनवते - प्रा.डॉ.सचिन खडके


💥वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी प्रा.डॉ.सचिन खडके बोलत होते💥

      वाचन ही काळाची गरज असून पुस्तकांबरोबरच अवतीभोवतीच्या परिसराचे ,परिवाराचे ,परिवारातील माणसांचे वाचन करित आपण आपला जीवन विषयक उदात्त दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. व्यापक आणि विशाल जगाच्या दर्शनासाठी वाचन ही प्रेरक प्रेरणा असून विवेक आणि विचाराच्या साथीनं आणि  वाचनाच्या व्यासंगाने आपण ही ज्ञानाचे ईश्वर तुकारामा सारखे सहिष्णू, समंजस,समन्वयी,आक्रमक रित्या न्यायासाठीचा लढा लढणारे लढवय्ये होवू शकता.असे अभ्यासपूर्ण मत प्रा डॉ सचिन खडके यांनी मांडले.

   कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय ,परभणी ग्रंथालय विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित व्याख्यान प्रसंगी प्रा.डॉ.सचिन खडके बोलत होते. 

    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डॉ.संगीता आवचार, व्यासपीठावर ग्रंथपाल प्रा.संतोष कीर्तनकार, ग्रंथालय सल्लागार समितीचे सदस्य प्रा.अरुण पडघन,प्रा.महेश जाधव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सुरुवातीस डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.बी.ए.प्रथम वर्षाच्या तन्वी स्वामी,साक्षी मोरे,अंकिता दुधवडे,श्रध्दा चेऊलवार,गीता कत्ते या विद्यार्थीनींनी एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र भित्तीपत्रकातून रेखाटले, डॉ.सचिन खडके यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले.

     विद्यार्थीनींनी ग्रंथा बरोबर सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकसमस्यांचे निराकरण करण्याची शैली विकसित करावी असे प्रतिपादन अध्यक्षिय समारोपात डॉ.संगीता आवचार यांनी केले प्रा.संतोष कीर्तनकार यांनी प्रास्ताविक केले.तर संचलन आणि आभार प्रा.महेश जाधव यांनी केले......टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या