💥जिंतूर तालुक्यातील बोरी येथील भास्कराचार्य सार्वजनिक वाचनालयात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी...!


💥यावेळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन देखील भरवण्यात आले💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील सार्वजनिक वाचनालयात डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्यी जयंती साजरी करण्यात आली तसेच वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव चौधरी होते तर प्रमुख पाहुणे शशिकांत चौधरी दत्तराव जाधव कुलदीपक जाधव हे होते अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले नंतर अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी रोहित घादगिने मयूर टाक बालाजी कंठाळे राजेश इगोले विठ्ठल चौधरी सदाशिव क्षीरसागर संतोष बारवकर ज्ञानेश्वर देशमुख झेलबा शिंपले माणिक चौधरी यांना हरकळ राजू गारकर शेख पाशा मारुती राऊत तसेच वाचनालयाचा बालवाचक वर्ग उपस्थित होता प्रस्तावित ग्रंथ मित्र मधुकर चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन लिपिक रामा ढाकरगे यांनी मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या