💥परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ आर्थिक मदत द्या....!


💥खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी💥 

परभणी (दि.१० आक्टोंबर) : जिल्ह्यात सर्वत्र सतत पडणार्‍या परतीच्या पावसाने तालुक्यासह जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासकीय यंत्रणेने तात्काळ पंचनामे करीत आपदग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे.

                     यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. अनेक भागात अतिवृष्टी झाली. जून महिना पूर्ण, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बहुतांशी पिके पाण्याखाली गेली. त्यातच परतीच्या सततच्या पावसामुळे सोयाबीन व कापूस ही काढलीला आलेली पिके अक्षरशः वाया गेली आहेत.  त्यामुळे शासकीय यंत्रणेने या नुकसानीची तात्काळ पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खासदार जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, गंगाप्रसाद आनेराव, भगवानराव धस, गोकूळ लोखंडे, सुभाष माने, सुभाष पाष्टे, माधवराव चोपडे यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या