💥कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश नोंदविण्यासाठी जिल्हाधिकारी यांचे आवाहन...!


💥सहाय्यक आयुक्त,कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता,परभणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे💥

परभणी (दि.4 आक्टोंबर) : - जिल्हयातील शेतकरी, शेती व्यवसाय करणारे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस तसेच इतर बेरोजगार यांना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी कडून किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2022-2023 या योजनेअंतर्गत आगामी होणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी मार्फत मधुमक्षीका पालन, रेशीम उद्योग, फळांपासून पेय व ज्यूस तयार करणे(स्कॅश ॲण्ड ज्यूस प्रोसेसींग टेक्नीशीअन), फळांच्या गरापासून विविध पदार्थ तयार करणे(फ्रुट पल्प प्रोसेसींग टेक्नीशीअन), विविध प्रकारचे मसाले तयार करणे (स्पाईस प्रोसेसींग टेक्नीशीअन) तसेच कृषी विज्ञान केंद्र (KVK) जिंतूर रोड,परभणी मार्फत - कम्बाईन हार्वेस्ट मशीन ऑपरेटर, कुकुटपालन आणि शासकीय ITI, परभणी - एलईडी लाईट दुरुस्ती करणे, शिलाई मशीन ऑपरेटर, शासकीय ITI, गंगाखेड – टेलरिंग, शासकीय ITI,सेलू - टिव्ही रीपेयर, शिवाय शासकीय ITI मानवत व पूर्णा मार्फत - इलेक्ट्रिक उपकरणे दुरुस्ती करणे, शासकीय उपजिल्हा रुग्णालय,सेलू - (वार्डबॉय) जनरल डयुटी ॲसीस्टंट, चीरायु हॉस्पीटल,सेलू मार्फत - मलमपट्टी बंधक ड्रेसर(वैद्यकीय) इत्यादी एकूण 14 कोर्सेसमध्ये मोफत कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कृषी क्षेत्रातील प्रत्येक कोर्ससाठी 60 याप्रमाणे व इतर कोर्ससाठी प्रत्येकी 30 याप्रमाणे असे एकूण 660 शेतकरी,  शेती व्यवसाय करणारे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस तसेच इतर बेरोजगार यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

जिल्हयातील 18 ते 45 वयोगटातील महिला, पुरुष यांनी उपलब्ध करुन देण्यात आलेल्या कोर्सेसमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षणात प्रवेश घेण्यासाठी दि. 22 ऑक्टोबर 2022 पूर्वी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, परभणी या कार्यालयास संपर्क साधून आपला प्रवेश निश्चीत करावा असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.‍

अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ(‍ किटकशास्त्र विभाग, अन्न व तंत्र महाविद्यालय), कृषी विज्ञान केंद्र, परभणी, संबधीत आयटीआय, इतर प्रशिक्षण संस्था किंवा सहायक आयुक्त, कौशल्य विकास विभाग यांचे (मो.क्र.9420788747), श्री सुमीत दिक्षीत (मो.क्र. 9890828797), श्री प्र.सु.रुद्रकंठवार (मो.क्र. 9860015383) या भ्रमणध्वनीवर किंवा 02452 220074 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा असे प्र.सो.खंदारे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, परभणी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या